क्वारंटाईन किंवा विलगीकरण
केंद्रीय स्वाथ्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने क्वारंटाईन किंवा विलगीकरण कधी आणि कसे करावे याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
कोणाचे क्वारंटाईन किंवा विलगीकरण करावे?
पुढील लोकांचे विलगीकरण करावे.
- कोव्हीड-19 चा रुग्ण असलेल्या घरामधील व्यक्ती
- कोव्हीड-19 च्या रुग्णाशी संबंध आलेल्या व्यक्ती
- विमानाने प्रवास करताना कोव्हीड-19 च्या रुग्णाशी एक मीटरपेक्षा कमी अंतरावर संबंध आलेल्या व्यक्ती.
घरामधील विलगीकरणाविषयी मार्गदर्शक सूचना
घरी विलगीकरण केलेल्या व्यक्तीने पुढील काळजी घ्यावी:
- अशा व्यक्तीने शक्यतो वेगळ्या खोलीत राहावे आणि इतरांपेक्षा वेगळे स्वच्छतागृह वापरावे. हे शक्य नसेल तर इतरांपासून निदान एक मीटरचे अंतर राखावे.
- घरामधील लहान मुले, म्हाताऱ्या व्यक्ती गर्भवती महिला किंवा मधुमेह/दमा असे आजार असलेल्या व्यक्तींपासून लांब राहण्यासाठी विशेष काळजी घ्यावी.
- विलगीकरण झालेल्या व्यक्तीने रोजच्या वापरामधील भांडी, गाद्या, उशा, पंचे, टॉवेल या वस्तू स्वतःसाठी वेगळ्या ठेवाव्यात. या वस्तू इतरांनी वापरू नयेत, त्यातून विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.वापरून झाल्यानंतर या वस्तू साबणाने धुवून ठेवाव्यात.
- या व्यक्तींनी वारंवार साबणाने हात धुवावेत किंवा हॅन्ड सॅनिटायझर वापरावा.
- या व्यक्तींनी सर्जिकल मास्क घालावा. मास्क दर 6 ते 8 तासांनी बदलावा आणि बंद पिशवीत घालून सर्जिकल वेस्ट मध्ये टाकावा.
घरामधील व्यक्तीचे विलगीकारण झाल्यास घरामधील इतर व्यक्तींनी घ्याची काळजी
- घरामधील एकाच व्यक्तीने विलगीकारण झालेल्या व्यक्तीची काळजी घ्यावी.
- विलगीकारण झालेल्या व्यक्तीची काळजी घेणाऱ्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या जवळ जाऊ नये.
- संसर्ग झालेल्या व्यक्तीला जेवण किंवा औषधे देताना चेहेऱ्यावर डिस्पोझेबल (वापरल्यावर ताबडतोब टाकून द्यायचे) मास्क आणि हातात डिस्पोझेबल हातमोजे घालावे.
- संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या आजूबाजूला स्वच्छता पाळावी. संसर्ग झालेल्या व्यक्तीने जिथे हात लावला असेल, ते सर्व पृष्ठभाग (स्वच्चतागृह,टेबल, गाद्या, पलंग, भांडी,कपडे) वारंवार साफ करावीत.
कोव्हीड-19 ची लक्षणे दिसत असल्यास , ताबडतोब राज्याच्या मदतकेंद्राला किंवा पूढील नंबरवर संपर्क साधा: 1075 or 011-23978046.
स्थलांतरित कामगारांसाठी सूचना
केंद्रीय स्वाथ्य आणि कुटुंबकल्याणमंत्रालयातर्फे स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या विलगीकरणासाठी सूचना जाहीर केल्या आहेत. त्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
स्थलांतरित कामगारांनी आपल्या नेहेमीच्या कामाच्या जागीच राहावे. यातील काही कामगार कामाची जागा सोडून आपापल्या गावी परत जात आहेत किंवा पोचले आहेत. हे कामगार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांच्या स्वाथ्यासाठी काही पावले उचलली जातील.
जे स्थलांतरित कामगार आपल्या नेहेमीच्या कामाच्या जागी आहेत त्यांच्यासाठी सूचना
जर रेल्वे स्टेशन किंवा बसस्टॅन्ड वर स्थलांतरित कामगारांचे घोळके दिसून आले, तर पुढील काळजी घेतली जाईल.
- या कामगारांचे नाव, फोन नंबर आणि पट्ट्याची नोंद केली जाईल.
- आरोग्यख्यात्याकडून या व्यक्तींचे तापमान घेतले जाईल.
- ताप आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाईल आणि त्यांना कोव्हीड- 19 असू शकेल का हे तपासले जाईल. त्यांच्यामध्ये कोव्हीड-19ची इतर लक्षणे दिसत आहेत का आणि त्यांचा कोव्हीड- 19 झालेल्या व्यक्तीशी संबंध आलेला आहे का हे तपासले जाईल.
- कोव्हीड-19 झाल्याची शंका आल्यास, त्या व्यक्तीला कोव्हीड-19च्या रुग्णांची सोय असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल आणि त्यांची चाचणी करण्यात येईल.
- कोव्हीड-19ची लक्षणे नसलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जाईल.
- साठ वर्षावरील व्यक्ती किंवा इतर आजार असलेल्या व्यक्तींची विलगीकरणासाठी राहण्याची वेगळी सोय केली जाईल. इतर व्यक्तींनी स्वतः घरी विलगीकरण करावे.
घराच्या वाटेवर असणाऱ्या स्थलांतरित कामगारांसाठी सूचना
- त्या भागात विलगीकरण केंद्र असेल किंवा ते तयार केले जात असेल. ही केंद्रे केंद्रीय सरकारच्या सूचनांनुसार तयार करण्यात येत आहेत.
- या केंद्रांमध्ये कामगारांची माहिती आणि तापमान घेतले जाईल.
- ताप आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाईल आणि त्यांना कोव्हीड- 19 असू शकेल का हे तपासले जाईल. त्यासाठी त्यांच्यामध्ये कोव्हीड-19ची इतर लक्षणे दिसत आहेत का आणि त्यांचा कोव्हीड- 19 झालेल्या व्यक्तीशी संबंध आलेला आहे का हे तपासले जाईल.
- कोव्हीड-19 झाल्याची शंका आल्यास, त्या व्यक्तीला कोव्हीड-19च्या रुग्णांची सोय असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल आणि त्यांची चाचणी करण्यात येईल.
- या व्यक्तींची राहण्याची सोय करण्यात येईल आणि कोव्हीड-19 ची माहिती देणारी पत्रके देण्यात येतील.
- विलगीकरण केलेल्या व्यक्तींची दररोज तपासणी करण्यात येईल आणि त्यांच्यामध्ये कोव्हीड-19 ची लक्षणे दिसत आहेत का हे तपासले जाईल.
घरी पोचलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी सूचना
घरी पोचलेल्या स्थलांतरित कामगारांची चौकशी जिल्हा प्रशासनातर्फे केली जाईल. इंटिग्रेटेड डिस्ट्रिक्ट सर्व्हेलन्स प्रोग्रॅम म्हणजेच जिल्हानिहाय तपासणीचा कार्यक्रम किंवा आयडीएसपीतर्फे ही चौकशी केली जाईल.
- आयडीएसपीतर्फे घरी आलेल्या सर्व कामगारांची मुलाखत घेतली जाईल.
- ताप आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाईल आणि त्यांना कोव्हीड- 19 असू शकेल का हे तपासले जाईल. त्यासाठी त्यांच्यामध्ये कोव्हीड-19ची इतर लक्षणे दिसत आहेत का आणि त्यांचा कोव्हीड-19 झालेल्या व्यक्तीशी संबंध आलेला आहे का हे तपासले जाईल.
- कोव्हीड-19 झाल्याची शंका आल्यास, त्या व्यक्तीला कोव्हीड-19च्या रुग्णांची सोय असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल आणि त्यांची चाचणी करण्यात येईल.
- कोव्हीड-19ची लक्षणे नसलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जाईल.
- साठ वर्षावरील व्यक्ती किंवा इतर आजार असलेल्या व्यक्तींची विलगीकरणासाठी राहण्याची वेगळी सोय केली जाईल. इतर व्यक्तींनी विलगीकरण करावे.
आयडीएसपीतर्फे घरी विलगीकरण केलेल्या सर्व कामगारांवर देखरेख केली जाईल.