कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आपल्या शरीरात काय घडते?​

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे  आपल्या शरीरात काय घडते?

कोव्हीड- 19 हा आजार SARS-Cov-2 या  विषाणूमुळे म्हणजे व्हायरसमुळे होतो. या व्हिडिओमध्ये  सार्स-कोव्ह- 2 शरीरात कसा शिरतो आणि माणसाच्या पेशींसाठी का घातक ठरू शकतो हे सांगितले आहे.

आमचे 3 डी अ‍ॅनिमेशन कसे रिमॅडेशिव्हर कार्य करते ते पहा

मधुमेह, रक्तदाब किंवा इतर आजार असलेल्या रुग्णांना कोव्हीड- 19 पासून जास्त धोका असतो. असे का ते या व्हिडिओमधून जाणून घ्या.​

सार्स-कोव्ह- 2 या विषाणूचा  संसर्ग होतो तेव्हा सर्वप्रथम हा विषाणू शरीरामधील  पेशींच्या किंवा “सेल्स” च्या आत शिरतो. आत शिरण्यासाठी  हा विषाणू पेशींवरील angiotensin-converting enzyme 2 (ACE2) किंवा  एसीई-२ नावाच्या प्रथिनाची मदत घेतो. हे एसीई-२ प्रथिन फुफ्फुसे, आतडी, मूत्राशय आणि रक्तवाहिनांवरील पेशींमध्ये  असते. रक्तदाब, मधुमेह या आजारांसाठी जी औषधे दिली जातात (जसे एसीई-२ चे कार्य थांबवणारी औषधे, thiazolidinediones  नावाचे औषध) त्यामुळे या पेशींवरील एसीई-२ प्रथिनाचे प्रमाण वाढते. ibuprofen किंवा आयबुप्रोफेन रसायन असलेली औषधे (जसे ब्रुफेन) वारंवार घेतल्यामुळेही या प्रथिनांचे पेशीवरील प्रमाण वाढू शकते.  एसीई-२ चे प्रमाण वाढल्यामुळे या पेशींमध्ये विषाणू आत शिरण्याची शक्यता वाढू शकते. 
त्यामुळे रक्तदाब आणि मधुमेह असलेले रुग्ण किंवा ब्रुफेनसारखी औषधे अनेक दिवस घेत असलेले रुग्ण यांना सार्स-कोव्ह- 2 चा संसर्ग व्हायची जास्त  शक्यता असू शकते. सध्या उपलब्ध असलेल्या संशोधनानुसार मांडलेला हा अंदाज किंवा गृहीतक आहे.

कोरोना विषाणूवर तापमानाचा  परिणाम

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सार्स-कोव्ह- 2 विषाणूचा  प्रसार जास्त तापमान असलेल्या किंवा दमट असलेल्या वातावरणातही  होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात तापमान वाढून प्रसार थांबू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या हवामानात सार्स-कोव्ह- 2 चा  संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. 

सार्स-कोव्ह- 2 विषाणूचा हवेमधून होणारा प्रसार

सार्स-कोव्ह- 2 हा विषाणू साधारण  50-200 नॅनोमीटर्स किंवा सरासरी 125 नॅनोमीटर्स  इतक्या आकाराचा असतो. (1 नॅनोमीटर म्हणजे साधारण एक मिलीमीटरच्या  1,000,000 पट लहान). इतका लहान असला तरी हवेमधील पाण्याच्या थेंबामधून (एरोसॉल मधून ) पसरण्यासाठी तो मोठा असतो.  त्यामुळे तो एरोसॉल मधून पसरण्याची शक्यता कमी आहे. हा विषाणू मुख्यतः खोकताना/शिंकताना निर्माण होणाऱ्या थेंबांमधून आणि हे थेम्ब ज्या पृष्ठभागावर पडतात त्या दूषित पृष्ठभागावरून पसरत असावा. पण तरी क्वचित ठिकाणी सार्स-कोव्ह- 2  हवेमधेही दिसून आहे. सिंगापूरमधील ज्या हॉस्पिटलमध्ये कोव्हीड- 19 झालेले तीन रुग्ण होते, तेथील एसी पाईपमध्ये सापडले आहेत. 

अभ्यासांवरून दिसते की  सार्स-कोव्ह-2 विषाणू  वेगवेगळ्या  पृष्ठभागांवर दोन ते तीन  दिवस असू शकतो.

सार्स-कोव्ह-2 विषाणू वेगवेगळ्या पृष्ठभागांवर किती वेळ जगू शकतो  केलेले आहेत. यात असे दिसून आले की हा विषाणू स्टील किंवा प्लास्टिकसारख्या  टणक पृष्ठभागांवर 72 तास तर कार्डबोर्डवर 24 तास जिवंत असू शकतो. त्याउलट तांब्याच्या पृष्ठभागावर हा विषाणू चारच तास जिवंत राहू शकतो.