चाचण्या

कोव्हीड-१९ च्या  चाचण्या करण्यासाठी  सरकारी मान्यता मिळालेल्या  प्रयोगशाळा

सार्स-कोव्ह-2 ची बाधा  झाल्याची शंका असलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यासाठी सरकारने  139 प्रयोगशाळा आणि तपासणीसाठी नाक किंवा घशामधील   स्त्रावाचा नमुना गोळा करण्यासाठी 3 प्रयोगशाळांना मान्यता दिली आहे. त्याशिवाय  65 खासगी  प्रयोगशाळांना ही चाचण्या  करण्यासाठी मान्यता दिली आहे. 

त्याशिवाय  सरकारच्या भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) या शाखेतर्फे अजून 6 सरकारी  प्रयोगशाळांना   चाचण्या करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.या प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी आवश्यक असलेले किट मात्र स्वतः घ्यावे लागेल,  त्या भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद पुरवणार नाही. सरकारद्वारा मान्यता मिळालेल्या किट्स या प्रयोगशाळा वापरू शकतात.

पुढील नकाशात चाचण्या करणाऱ्या आणि नमुने  गोळा करणाऱ्या केंद्रांची माहित आहे. त्या त्या  केंद्रावर क्लिक केल्यास तपशीलवार माहिती मिळेल.