ऑफिससाठी सूचना

भारतामधील  39% लोक म्हणजे साधारण  400 मिलियन किंवा 40 कोटी लोक नोकरी/व्यवसाय करतात. या आर्थिक व्यवहारामुळे आरोग्यसेवाही  चांगल्या प्रकारे देता येते. जसे डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासाठी आवश्यक मास्क, पीपीई किंवा हातमोजे तयार करणारे कारखाने चालू असल्याशिवाय या सुविधा उपलब्ध होणार नाहीत. अशा परिस्थतीत नोकरी देणारे  कारखानदार किंवा इतर व्यावसायिक यांच्यावर रोजगार पुरवणे आणि आरोग्यसेवा देणे या दोन्हीची जबाबदारी आहे.   

ऑफिसमध्ये घ्यायच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या  सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. सध्या देशभर सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे बरीचशी ऑफिसेस बंद आहेत. जेव्हा ऑफिसेस सुरु होतील तेव्हा या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

Entrepreneurs Organization  किंवा  इओ या  व्यावसायिकांच्या संघटनेबरोबर  काम करून ऑफिसमध्ये घ्यायच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे कोव्हीडइंडियाचे  ध्येय आहे. त्यासाठी कोव्हीडइंडिया ने myEO COVID Preparedness India Subgroup, Smartworks आणि इओबरोबर  एक मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. नोकरदार आणि उद्योजक या दोघांसाठी कोव्हीड-19 च्या साथीमध्ये स्वतःला सुरक्षित ठेऊन काम कसे करत करावे यासंबंधी सूचना यात आहेत.

Share with a friend